Tuesday, May 26, 2009

धार्मिकतेची ग्लोबल लिंक

**** आजची वात्रटिक *****
********************

धार्मिकतेची ग्लोबल लिंक

टुंड्रा प्रदेशात पडतो बर्फ
त्याची वाळवंटात शिंक असते.
धार्मिक भावना दुखण्याची
अशीच तर ग्लोबल लिंक असते.

असे फक्त धार्मिक बाबतीतच
लोक नको तेवढे जागे असतात !
शेजारच्याच्या सुख-दु:खाबाबत
लोक केवळ बघे असतात !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Monday, May 25, 2009

काँम्रेड.......

****** आजची वात्रटिका******
***********************

काँम्रेड.......


काँम्रेड,असे मूळीच नाही
तुला कशाचेच ज्ञान नाही
एवढे मात्र नक्की की,
तुला वास्तवाचे भान नाही.

परिवर्तनाचा साधा नियम
अजूनही तू पाळला नाहीस.
तुझी भूमिका रास्त असूनही
माणसात माणसाळा नाहीस.

तुमच्या अढळ निष्ठा पाहून
लोक म्हणतात,हे हेकट आहेत !
काँम्रेड, ढळू नकोस,चळू नकोस
तुझेही दिवस निकट आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

http://suryakantdolase.blogspot.com/

काँम्रेड.......

****** आजची वात्रटिका******
***********************

काँम्रेड.......


काँम्रेड,असे मूळीच नाही
तुला कशाचेच ज्ञान नाही
एवढे मात्र नक्की की,
तुला वास्तवाचे भान नाही.

परिवर्तनाचा साधा नियम
अजूनही तू पाळला नाहीस.
तुझी भूमिका रास्त असूनही
माणसात माणसाळा नाहीस.

तुमच्या अढळ निष्ठा पाहून
लोक म्हणतात,हे हेकट आहेत !
काँम्रेड, ढळू नकोस,चळू नकोस
तुझेही दिवस निकट आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

http://suryakantdolase.blogspot.com/

Sunday, May 24, 2009

उद्धव विरुद्ध राज

***** आजची वात्रटिका ****
*********************

उद्धव विरुद्ध राज

राजकीय भांडणातसुद्धा
मराठी बाणा जपायला लागले.
अगदी ठाकरी शैलीमध्येच
एकमेकांना झापायला लागले.

मराठी माणसाच्या नावाखाली
वेगवेगळे हेतु आहेत
त्यांचे प्रबोधन कुणी करावे ?
ते तर प्रबोधनकारांचे नातु आहेत.

सेनापतींच्या बाळकडूमुळेच
हा मार्मिक सामना रंगतो आहे !
चित्र-विचित्र व्यंग पाहून

दोन्हीकड्चा सैनिक खंगतो आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Saturday, May 23, 2009

बहुमताचा चमत्कार

बहुमताचा चमत्कार

बहुमताचे चमत्कार
तेंव्हाच कळू लागतात.
जेंव्हा बिनशर्त पाठिंबा घेऊन
पक्षच मागे पळू लागतात.

सरकार स्थिर असले की,
सगळेच काही स्थिर असते !
तिथेच बोटे घालता येतात
जिथे थोडीफार चिर असते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Friday, May 22, 2009

प्रचाराची जातकुळी

***** आजची वात्रटिका ****
*********************

प्रचाराची जातकुळी

कुठे तुतारी वाजवली होती
कुठे टाळी वाजवली होती.
जातीयवादी प्रचाराने
अंदाधुंदी माजवली होती.

जातीसाठी माती खात
जातीने जातीला जागले होते.
स्वत:ला पुरोगामी समजणारेही
जातीने प्रचाराला लागले होते.

आम्हीच कशाला सांगावे ?
सर्वांनाच सगळे द्न्यात आहे !
जय आणि पराजयातही
खरा जातीचाच हात आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

जातीसूत्र

जातीसूत्र

जात जन्माला येत नाही
जात जन्मानंतर रूजवली जाते.
जात जातीय खुणांनी
छान सजवली-धजवली जाते.

जात गेल्यासारखी वाटते.
पण जात काही जात नाही.
जात म्हणजे असाध्य रोग
उपाय काही द्न्यात नाही.

जात जाईल कशी ?
जात जातीने पाळली जाते.
जात जातीला भेटताच
जात जातीवर भाळली जाते.

जातीच्या मूळाशी
जाती-जातीचे गोत्र असते !
’ रूजवा आणि माजवा ’
हे जाती-जातीचे सूत्र असते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Thursday, May 21, 2009

मतदानाचा पर्दाफाश

मतदानाचा पर्दाफाश

बुथवरचे मतदान
उघडे पडू लागले.
कार्यकर्त्यांचे बुरखे
मतदानयंत्र फाडू लागले.

बुथवरचे गुप्त मतदान
उघड होणे बरे नाही !
बोल घेवड्या कार्यकर्त्यांचे
आता काही खरे नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

मतदान यंत्रांचा गौप्यस्फोट

मतदान यंत्रांचा गौप्यस्फोट


केंद्रा-केंद्रावरच्या मतदानाचे
गौप्यस्फोट होऊ लागले.
लोकशाहीच्या मूळ तत्त्वांचाच
यंत्र घोट घेऊ लागले.


लोकशाहीचे मूळ तत्त्वच
खरे तर ’गुपित’ आहे !
हे यांत्रिक वरदान
गावा-गावांसाठी शापित आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, May 20, 2009

खानदानी दुश्मनी

खानदानी दुश्मनी


वाटेकरी वाढताच
खाली घसरावे लागले.
रक्ताचे नातेही
मराठीसाठी विसरावे लागले.


मराठीच्या मुद्दयावरून
सेने-सेनेत आणीबाणी आहे !
ही दुश्मनी साधी नाही,
ती तर खानदानी आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

खानदानी दुश्मनी

खानदानी दुश्मनी


वाटेकरी वाढताच
खाली घसरावे लागले.
रक्ताचे नातेही
मराठीसाठी विसरावे लागले.


मराठीच्या मुद्दयावरून
सेने-सेनेत आणीबाणी आहे !
ही दुश्मनी साधी नाही,
ती तर खानदानी आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

ह्र्दयसम्राटांची ह्र्दयशून्यता

****** आजची वात्रटिका******
***********************

ह्र्दयसम्राटांची ह्र्दयशून्यता


पेशवाईचा इतिहास
पुन्हा पेश होऊ लागला.
आश्चर्याने चकित
मराठी देश होऊ लागला.


कु-हाडीचा दांडाच
इथे गोतास काळ झाला.
लोकसभेच्या भड्क्याने
आणखीनच जाळ झाला.


मातोश्रीवरून कॄष्णकुंजवर
मराठीचे बि-हाड आहे !
रक्ताच्या नात्यावर
काकांची कु-हाड आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, May 19, 2009

रस्त्यावरचे विश्लेषण

रस्त्यावरचे विश्लेषण


राजकीय परिपक्वतेचे
दिवस सरायला लागले.
लोक पराभवाचे विश्लेषण
रस्त्यावर करायला लागले.


पराभव मान्य करणे
हा मुद्दा जरी सोयीचा नाही !
तरी रस्त्यावर विश्लेषण करणे
हा मार्ग लोकशाहीचा नाही !!


-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

पराभवाचे अपचन

पराभवाचे अपचन


जसा राजकारणाचा कडू घोट
सहज रिचवता आला पाहिजे
तसा राजकीय पराभवही
सहज पचवता आला पाहिजे.


कार्यकर्त्यांच्याही पचनी
पराभव पडायला पाहिजे !
ज्यांना हे जमत नाहीत्यांनी,
राजकारण सोडायला पाहिजे!!


-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Monday, May 18, 2009

भावी ते भावीच !

****** आजची वात्रटिका ******
************************

भावी ते भावीच !

भल्या भल्यांना धडा शिकवायला
लोक काही चुकले नाहीत.
भावी पंतप्रधानपद मात्र
लोक काढून घेऊ शकले नाहीत.

स्वप्न तर पहावीच लागतात
आशा कही सुटू शकत नाही !
भावी पंतप्रधानपद काही
पाच वर्षॆ तरी हटू शकत नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Sunday, May 17, 2009

दोन्ही घरचा पाहुणा......

****** आजची वात्रटिका ******
************************

दोन्ही घरचा पाहुणा......

सिद्धिविनायक आणि विठोबा
दोघेही पावले होते.
विजय मागे येत रहिले
जिकडे ते धावले होते.

श्रद्धा होती,सबुरी होती
तरी लोकांना भावले नाहीत.
शिर्डीवाले साईबाबा
त्यांना काही पावले नाहीत.

सबका मालिक एक
तो सगळ्यांनी पाहिला आहे !
दोन्ही घरचा पाहुणा
उपाशीच राहिला आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Saturday, May 16, 2009

निकालाची दशा आणि दिशा

निकालाची दशा आणि दिशा

सर्वच पोलवाल्यांना
निकालांनी मागे टाकले आहे.
बिचारे कमळ तर
फुलता फुलता सुकले आहे.

आपलीच ’लाल’ म्हणायची
डाव्यांची संधी हूकली आहे.
नवनिर्माणाची उपद्रवक्षमता
सेनेला कळून चुकली आहे.

भंगलेल्या स्वप्नांनी
घड्याळाला काटे फुटले आहेत
हात मात्र हाताला
टाळ्या देत सुटले आहेत.

हत्ती लाकडॆ फोडीत बसला
मुंग्यांनी साखर खाल्ली आहे !
राजकीय स्थैर्याकडे
हळुहळू संसद चालली आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

निकालाची दशा आणि दिशा

निकालाची दशा आणि दिशा

सर्वच पोलवाल्यांना
निकालांनी मागे टाकले आहे.
बिचारे कमळ तर
फुलता फुलता सुकले आहे.

आपलीच ’लाल’ म्हणायची
डाव्यांची संधी हूकली आहे.
नवनिर्माणाची उपद्रवक्षमता
सेनेला कळून चुकली आहे.

भंगलेल्या स्वप्नांनी
घड्याळाला काटे फुटले आहेत
हात मात्र हाताला
टाळ्या देत सुटले आहेत.

हत्ती लाकडॆ फोडीत बसला
मुंग्यांनी साखर खाल्ली आहे !
राजकीय स्थैर्याकडे
हळुहळू संसद चालली आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

अर्धवट सत्य

अर्धवट सत्य

उमेदवारांच्या जिंकण्याचा
महाविनोदी किस्सा असतो.
अर्धेच होते मतदान
वाट्याला अर्धा हिस्सा असतो.

अर्ध्याचा अर्धा हिस्सा म्हणजे
तो हिस्सा तर पाव असतो !
नेतॄत्वाच्या लोकमान्यतेचा
हा लोकशाही आव असतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Friday, May 15, 2009

कार्यकर्त्यांनो......

****** आजची वात्रटिका******
***********************


कार्यकर्त्यांनो......

नेते राहतात बाजूला
तुम्हांलाच झुंजवले जाते.
उपेक्षॆच्या मातीमध्ये
तुम्हांलाच गंजवले जाते.

त्यांनी छू म्हटले की,
तुम्ही धावत सुटता.
शेपटीच्या तालावरती
तुम्ही चावत सुटता.

निष्टा आणि मूर्खपणात
मूलभुत फरक असतो !
राजकारण एवढे घाण की,
तो दुसरा नरक असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

ऑर्कुट चे वास्तव

******* आजची वात्रटिका *******
**************************

ऑर्कुट चे वास्तव

चेहर्यावर अनेक चेहरे
लावतात लोक येथे.
गर्ल्स फ्रेण्ड्च्याच मागे
धावतात लोक येथे.

कौपी-पेस्ट्चाच मंत्र
इथे जपवला जातो.
कुठे न खपलेला माल
इथे खपवला जातो.

मैत्रीची नातीही इथे
तकलादू-बेगडी असतात.
आपल्या घराचे दरवाजे
कुठे सर्वांसाठी उघडी असतात ?

नकली नावे,नकली चेहरे
जो तो इथे मिरवतो आहे !
वास्तवाच्या आभासामध्ये
खरा चेहराही हरवतो आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Thursday, May 14, 2009

आमचा अंदाज

ஓஓ छ्त्रपती संभाजी राजे यांच्या ३५३ व्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा !! ஓஓ


****** आजची वात्रटिका******
***********************

आमचा अंदाज

ज्योतिषावाले मोकाट,
एक्झिट पोलवर बंदी असते.
निवडणूक काळात कुडमुड्यांना
आयतीच सुवर्णसंधी असते.

जोतिषांवर बंदी घाला,
हा वेडेपणा आम्ही करणार नाही !!
त्यांचा एवढा चांगला कंड
दुसरीकडे कुठेच जिरणार नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, May 13, 2009

मुखपत्राचे फायदे

मुखपत्राचे फायदे

पाहिजे तेंव्हा,पाहिजे ते
पिल्लू सोडता येते.
पाहिजे तेंव्हा विरोधकांना
झोड झोड झोडता येते.

मुखात एक,पत्रात एक
वेगळी भूमिका मांडू शकतो !
आपलीच लाल म्हणीत
विरोधकांशी भांडू शकतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

विसंगत भविष्य़

****** आजची वात्रटिका *****
***********************

विसंगत भविष्य़

वावड्या मागे वावड्या
विधानामागे विधान आहे.
दिवसा-दिवसाला नवा
भावी पंतप्रधान आहे.

कुणाच्या राजकीय चाली,
कुणाच्या आकलेचे तारे आहेत !
तरूणांच्या देशाचे
पंतप्रधान मात्र म्हातारे आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, May 12, 2009

सत्तेचे इर्जिक

सत्तेचे इर्जिक


नवनवी समीकरणे
नवनवी जुळवाजुळव आहे.
मतभेदांच्या नांगरटीवर
मनोमिलनाचा कुळव आहे.



मनोमिलनाच्या कुळवाने
मतभेदाचे ढेकळ फुटू लागले !
सत्तेच्या इर्जिकासाठी
सारे कंबर कसून झटू लागले !!


-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

नट्यांचे भविष्य़

***** आजची वात्रटिका******
**********************

नट्यांचे भविष्य़


पडद्यावरच्या नट्यांना
कुठलाही आडपडदा राहिला नाही.
असा एकही अवयव नाही
जो तुम्ही-आम्ही पाहिला नाही.


चित्रपटातल्या मायेपोटी
नट्या काया तोलीत होत्या !!
भविष्य़ाला ओरडून सांगावे लागेल,
इथे नट्य़ासुद्धा कपडे घालीत होत्या !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)

Monday, May 11, 2009

चेंडूच चेंडूच चोहीकडे

चेंडूच चेंडूच चोहीकडे

मैदानात चेंडू,
मैदानाबाहेर चेंडू
चेंडूच चेंडू दिसू लागले.
चॆंडूच्या उसळ्या बघून
प्रेक्षक आ वासू लागले.

ब्याटींगची आवड असणारेही
ब्वालींगचा आग्रह धरीत आहेत !
नाचणार्या गर्ल्स बघून
एकमेकांना चिअर्स करीत आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

आयपीएल मटका

आयपीएल मटका

प्रत्येक चेंडूवरती ओळखा
किती धावांचा फटका आहे?
ट्वॆंटी-௨0 च्या नावावरती
हा सरळ-सरळ मटका आहे.

ओपन-क्लोज नसले तरी
संगमची पत्ती मात्र
सहाच अंकी आहे !
हरणार्या आणि जिंकणार्यांसाठीही
चिअर्स गर्ल्सची नौटंकी आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

सदिच्छा भेटी

सदिच्छा भेटी

नको ते,नको त्यांना
गुपचूप दिलासे देतात
गाजावाजा झाला की,
सदिच्छांचे खुलासे देतात.

सदिच्छांच्या नावाखाली
वेगळेच धोरण असते !
विरोधकांच्या स्वागतालाही
दारावरती तोरण असते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

विडंबनाचे ’रण’ कंदन

****** आजची वात्रटिका******
***********************

विडंबनाचे ’रण’ कंदन

विडंबनाच्या परंपरेला
आमचे त्रिवार वंदन आहे
राष्ट्रगीताच्या विडंबनावरून
नवीनच ’रण’ कंदन आहे.

राष्ट्रीय प्रतिकांच्या विडंबनला
कुणी मान्यता देवु शकत नाही!
कितीही मुक्ताफळे उधळा,
झेंडूंच्या फुलांची सर
कुणालाच येवु शकत नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Sunday, May 10, 2009

मदर्स डे

OO जागतिक मातृत्त्व दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !! OO


****आजची वात्रटिका*****
*******************

मदर्स डे

मायपासून मम्मीपर्यंत
तिचे ग्लोबलायझेशन झाले आहे.
’मदर्स डे’ चे फळही
तिच्या मातृत्त्वाला आले आहे.

लक्षात घ्या गर्भातील मुलगीही
भविष्यकाळाची आई असते !
न फिटणारे ॠण फेडण्याची
आपल्याला उगीचच घाई असते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Saturday, May 9, 2009

निर्बुद्धतेची लक्षणे

॥अखिल जगताला शांततेचा आणि मानवतेचा संदेश देणार्या तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा !! ॥

*******आजची वात्रटिका*******
*************************

निर्बुद्धतेची लक्षणे

युद्धांचा किळस यावा
ही शांततेची सिद्धता आहे.
कळूनही वळत नाही
हीच खरी निर्बुद्धता आहे.

खरा निर्बुद्ध तोच
जो आत्मद्न्यान पाजळत नाही !
अंगी शक्ती असूनही
जो स्वत: उजळत नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Friday, May 8, 2009

मुकुल शिवपुत्र

मुकुल शिवपुत्र

गायकीवर जग ज्याच्या
आम्ही भाळताना पाहिले.
गंधर्वास काल त्या
रस्त्यावरी लोळताना पाहिले.

मूक झाले स्वर सारे,
स्तब्ध झाले मायबाप हे
गंधर्वासारखा गंधर्वही
का आज भोगतो शाप हे ?

ग्लासात बुडाली कला,
गंधर्वाची ही दशा आहे !
दोस्तहो,समजून घ्या
ही कलावंताची भाषा आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

नो स्मोकिंग

नो स्मोकिंग

सचित्र इशार्याकडे
ओढणारे लक्ष देतील काय ?
इशारा कोणताही असो
ओढल्याशिवाय राहतील काय ?

समजणारांना इशारा पुरेसा,
चित्राची कुठे आशा असते ?
जी इशारा जुमानत नाही
तीच तर खरी नशा असते !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

सरड्यांचा आनंदोत्सव

****आजची वात्रटिका***
******************

सरड्यांचा आनंदोत्सव

त्रिशंकूची चाहूल लागताच
खालीवरती जीव होतो.
कुंपणावरच्या सरड्यांना मात्र
मनापासून चेव येतो.

कुंपणापर्यंत धाव जरी
रंग दाखवायला वाव असतो !
जे बदलतील रंग जास्त
त्यांनाच वाढीव भाव असतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
________________________________________________________________

________________________________________________________________

Thursday, May 7, 2009

कबुली जबाब

कबुली जबाब

राजकीय मित्रत्त्वाचे
उगीचच आव होते
त्यांनीच कबूल केले
सारे रडीचेच डाव होते.


परस्परांच्या गद्दारीचे
आता जाहिर उद्धार आहेत !
गद्दारच सांगु लागले
कोण किती गद्दार आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

दोस्त हो......

****आजची वात्रटिका***
******************

दोस्त हो......


जरा आवरा दोस्त हो
झाले तेच फार झाले.
सार्या जगास ठावे,
तुम्ही कशासाठी यार झाले ?


ना दुश्मनी पाळता येते,
ना दोस्ती पाळता येते.
कुत्र्यास आपल्या शेपटीची
ना सवय टाळता येते.


हातात हात,पायात पाय
हा दुटप्पीपणा बरा नाही !
लोकशाहीच बदनाम व्हावी
एवढा लुच्चेपणा खरा नाही !!


-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)

________________________________________________________________

Wednesday, May 6, 2009

पालकांचा छंदिष्ट्पणा

पालकांचा छंदिष्ट्पणा

शाळेपासून सुटका होताच
मुले क्लासेसला कोंबली जातात.
छंदवर्गाच्या नावाखाली
मुले अक्षरश: डांबली जातात.

छंद तर लागला पाहिजे
छंद असा लादला जाऊ नये !
मुलांच्या माध्यमातुन
छंदिष्टपणा साधला जाऊ नये !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

राजा आणि राजपुत्र

राजा आणि राजपुत्र


जाणत्या राजाची खिल्ली
राजपुत्रही उड्वू लागला.
घराण्याच्या वारश्यावरती
नवा कळस चढ्वू लागला.


कधी काय होईल
याचा कुठे नेम आहे !
राजपुत्राने सांगुन टाकले
लोकशाही हा नंबर गेम आहे !!


-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)

________________________________________________________________

Monday, May 4, 2009

पाठिंब्याचे ’पार्टी’ शन

****** आजची वात्रटिका*****
**********************

पाठिंब्याचे ’पार्टी’ शन

अपारंपारीक उर्जेशिवाय
विनयात उद्धट्पणाचे
फलोत्पादन होऊ शकत नाही.
तिहेरी पाठिंब्याची भाषा
कोरेपणाने येऊ शकत नाही.

जनसुराज्याचा संकल्प,
नवनिर्माणाचीही गोडी आहे !
पाठिंब्याच्या पार्टीशनची कथा
वर्णावी तेवढी थोडी आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Sunday, May 3, 2009

शैक्षणिक पराभव

****** आजची वात्रटिका*****
**********************

शैक्षणिक पराभव

शिक्षणाची नाळ
ध्येयापासून तोडली जात आहे.
विद्यार्थ्यांची हुशारी
परीक्षॆशी जोडली जात आहे.

परेक्षॆतील गुणांवरच
विद्यार्थी गुणवंत ठरू लागले !
कागदी गुणवत्तेच्या भितीपोटी
विद्यार्थी आत्महत्या करू लागले !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

****************************************************************
*जागतिक हास्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!*
****************************************************************

Saturday, May 2, 2009

सुवर्णमहोत्सवी पुरोगामित्व

****** आजची वात्रटिका*****
**********************

सुवर्णमहोत्सवी पुरोगामित्व

अंधश्रद्धा निर्मुलन विधेयकाला
जादूटोण्याने ग्रासलेले आहे.
महाराष्ट्राचे पुरोगामित्व
टोलवाटोलवीला त्रासलेले आहे.

पुरोगामित्वाचा मामला असा
नको तेवढा हलाखीचा आहे !
हा काही जादूटोणा नाही
मामला हातचलाखीचा आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Friday, May 1, 2009

अपराधी कोण ?

अपराधी कोण ?

प्रगल्भ लोकशाहीच्या दिशेने
आमचे पाऊल पडत नाही.
कितीही गाजावाजा झाला तरी
मतदान काही वाढत नाही.

राजकीय गप्पांएवढा
मतदानात काही जो्श नसतो !
नालायकांच्या हाती सत्ता जाते
यात नालायकांचा दोष नसतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

दैनिक वात्रटिका19मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -286वा

दैनिक वात्रटिका 19मार्च2024....वर्ष- तिसरे.. अंक -286वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1-fbx6QEScldHj2QiABT650...