Wednesday, June 30, 2010

प्राचार्य....(श्रद्धांजली)

विलिनीकरण

***** आजची वात्रटिका *****
****************************

विलिनीकरण

येऊ नये त्यांच्या ओठी
विलिनीकरणाचे शब्द आले.
घड्याळातले लहान-मोठे काटे
जागच्या जागी स्तब्ध झाले.

बेदखल म्हणता म्हणता
त्यांची चांगलीच दखल आहे !
विलिनीकरणाच्या कोड्याची
वेगवेगळी उकल आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, June 29, 2010

लवचिकता

***** आजची वात्रटिका *****
*************************

लवचिकता

मतभेद झाले तरी
मतात भेद होऊ .नयेत.
आपल्याला देण्याऐवजी
विरोधकांना देऊ नयेत.

मतभेद असले तरी
मतांसाठी भेद झाकले जातात !
स्वत:ला ताठर समजणारेही
ऐनवेळी वाकले जातात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Sunday, June 27, 2010

महागाईचे सूत्र

***** आजची वात्रटिका *****
****************************


महागाईचे सूत्र

इंधनात भाववाढ झाली की,
सर्वत्र आग-आग होते.
बाकीच्यांची भाववाढ करणे
ज्याला-त्याला भाग होते.

महागाईच्या गणिताचे
असे साधे सोपे सूत्र आहे !
महागाई म्हणजे महागाई
ती इत्र,तत्र,सर्वत्र आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Saturday, June 26, 2010

सामाजिक न्याय

***** आजची वात्रटिका *****
************************

सामाजिक न्याय

इतरांसाठी खूप केले
सांगा आमच्यासाठी काय आहे?
राजा,हाच आजकालचा
सामाजिक न्याय आहे.

जेंव्हा समाज म्हणजे जात होतो,
जेंव्हा समाज म्हणजे पंथ होतो !
जेंव्हा समाज म्हणजे धर्म होतो,
तेंव्हा सामाजिक न्यायाचा अंत होतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Friday, June 25, 2010

नवर्‍यांचे मनोगत

***** आजची वात्रटिका *****
*************************

नवर्‍यांचे मनोगत

जर आमची या जन्मात
झाली ती फजिती झाली नसती.
तर आम्हीसुद्धा बायकोप्रमाणे
वटसावित्रीची पूजा केली असती.

या जन्मीचे दिले सोडून
साताजन्माचे बघितले जात आहे !
आमची परवानगी न घेताच
साताजन्मासाठी मागितले जात आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Thursday, June 24, 2010

कमळाबाईची वटसावित्री

बेस्ट ऑफ सिक्स

***** आजची वात्रटिका *****
***************************

बेस्ट ऑफ सिक्स

ज्याला पाचाने भागले होते
त्याला आता सहाने भागायचे.
नव्या टक्केवारीचे आकडे
आपले आपणच बघायचे.

बेस्ट ऑफ फाईव्ह गेले
आता बेस्ट ऑफ सिक्स आहे !
विद्यार्थ्यांच्या गळ्यामध्ये
आकडेवारीची दोरी फिक्स आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, June 23, 2010

दुभंगाचे अभंग

***** आजची वात्रटिका *****
**************************

दुभंगाचे अभंग

बाणांचा राडा
कमळ थिजले
बारा वाजले
युतीत्त्वाचे ॥१॥

युतीचे अस्थाय़ीपण
सोसवेना ताण
सैरभर बाण
संभाजीनगरी ॥२॥

एका जनार्दनी
नाथ खडसावितो
वाघ भेड्सावितो
भित्र्यास ॥।३॥

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, June 22, 2010

कॉपीमुक्तीची झळ

***** आजची वात्रटिका *****
**************************

कॉपीमुक्तीची झळ

जो माल कालपर्यंत विकला
तो माल आज विकता येत नाही.
हातातून चाललेला विद्यार्थी
शिक्षकांना रोखता येत नाही.

कॉपीमुक्तीच्या आगीत असे
शिक्षकांना पोळावे लागत आहे !
"पोरं देता का पोरं?"म्हणीत
पालकांमागे पळावे लागत आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड) ~

Monday, June 21, 2010

साप्ताहिक सूर्यकांती....वात्रटिकांचा नजराणा...अंक ४ था


https://docs.google.com/fileview?id=0B1TQHEtO6wdqY2Q4MjE0ZjUtYmY4NS00MDY1LWFmMjEtZGUzZDliODZlYTM3&hl=en

राड्याचा पाढा

***** आजची वात्रटिका *****
***************************

राड्याचा पाढा

जो गिरवला गेला
तोच पाढा पुन्हा असतो.
म्हणूनच सैनिकांचा
तोच राडा पुन्हा असतो.

राड्याला राडा म्हणीत नाहीत,
त्याला प्रतिक्रिया म्हटले जाते !
पाठीराखे वाढले की,
सैनिकांचे भान सुटले जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Saturday, June 19, 2010

फुटबॉल आणि क्रिकेट

***** आजची वात्रटिका *****
******************************

फुटबॉल आणि क्रिकेट

एकीकडे छोटा तर
दुसरीकडे मोठा आकार असतो.
फुटबॉल आणि क्रिकेट
चेंडूच्याच खेळाचा प्रकार असतो.

फुटबॉलमध्ये लाथाळला जातो,
क्रिकेटमध्ये हाताळला जातो !
चेंडूचा आकार केवढाही असो
खेळाडूंचा घाम निथळला जातो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Friday, June 18, 2010

फुटबॉल

डबल गेम

***** आजची वात्रटिका *****
*****************************

डबल गेम

बारावीच्या निकालावर
दहावीने शिक्का मारला.
खोट्या गुणवत्तेच्या उतरंडीला
कॉपीमुक्तीने धक्का मारला.

ज्यांचा बारावीचा घटला होता
त्यांचा दहावीचाही घटला आहे!
गुणवत्तेच्या पॅटर्नचा फुगा असा
सलग दुसर्‍यांदा फुटला आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Thursday, June 17, 2010

खत टंचाई

***** आजची वात्रटिका *****
*****************************

खत टंचाई

व्यापार्‍यांकडून व्यापार्‍यांना
बरोबर फितवले जाते.
कृत्रिम टंचाई निर्माण करून
शेतकर्‍यांना सतवले जाते.

खताच्या टंचाईची अशी
मोक्याच्यावेळी बतावणी असते !
खत जाते तिसरीकडे
दुसरीकडेच खतावणी असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, June 16, 2010

धनाजीराव

***** आजची वात्रटिका *****
*******************************

धनाजीराव

ज्यांनी करावे त्यांनीच केले
त्यात काय फारसे आहे?
काकांकडून पुतण्याच्या
नव्या नावाचे बारसे आहे.

शत्रुलाही धन्य वाटावे
त्यांची शैलीच तेवढी खास आहे !
धनाजीरावांच्या बाबतीत मात्र
मोठ्या तोंडी लहान घास आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, June 15, 2010

जनगणना

******* आजची वात्रटिका *******
***********************************

जनगणना

काय मोजावे ?काय मोजू नये?
जरी हळूच कुजबूजले जाते.
ज्यांना कुणीच मोजत नाही
त्यांनाही जातीने मोजले जाते.

यांना टाळा,त्यांना टाळा
अशी निवडा-निवड बंद असते !
"हम सब एक हैं" सांगणारी
एवढीच तर एक नोंद असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

साप्ताहिक सूर्यकांती.....वात्रटिकांचा नजराणा..अंक ३ रा

साप्ताहिक सूर्यकांती.....वात्रटिकांचा नजराणा..अंक ३ रा....वाचा एका खास ढंगात ईबुक वाचण्याचा खराखुरा आनंद घ्या....

http://www.onsitecatalog.com/demo/1899267a7cab6c98197ea43751df1c07/
ही संधी मर्यादित आहे..चला क्लिक करा वरील लिंकवर.....वाचा आणि प्रतिक्रिया कळवा

Sunday, June 13, 2010

मुद्दयांचे नवनिर्माण

***** आजची वात्रटिका *****
****************************


मुद्दयांचे नवनिर्माण

वाघाच्या डरकाळीवर
रेल्वे इंजिन शिट्ट्या मारु लागले.
गुहेतल्या भेगा शोधून
बरोबर खुट्ट्या मारू लागले.

आपल्या सोडून दुसर्‍या सेनेला
सेनापतींचे फर्मान आहे !
महाराष्ट्राचे माहिती नाही
मुद्दयांचे मात्र नवनिर्माण आहे !!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Saturday, June 12, 2010

मनसे ते धनसे

***** आजची वात्रटिका *****
*************************

मनसे ते धनसे

१३ चा आकडा अशुभ नाही
हे आपल्या ध्यानात येऊ शकते.
जे मनसे होऊ शकत नाही
ते धनसे होऊ शकते.

धन धना धन धन्
हाच लोकशाहीचा ताल आहे !
जो राजकीय तडजोडी करतो
तोच आज मालामाल आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
________________________

सा.सूर्यकांती अंक २रा http://sites.google.com/site/pimpalepatil/suryakanti..new......8june2010.pdf?attredirects=0&d=1इथुन डाऊनलोड करू शकता.

फाईल साईझ १.३एम.बी

Friday, June 11, 2010

संपादकीय पाढे

****** आजची वात्रटिका *******
***********************************

संपादकीय पाढे

अग्रलेखाचे अग्र
कमळाला टोचायला लागले.
संपादकीय पाढे
मित्रवर्य वाचायला लागले.

मित्रवर्यांचा विश्वास नाही,
वाचकांनी विश्वास कसा ठेवायचा ?
अग्रलेख संपादकांचे नसतात,
यावरून अर्थ असा लावयचा !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

मैत्रीचे राजकारण

***** आजची वात्रटिका *****
*********************

मैत्रीचे राजकारण

जेंव्हा मित्रच मित्राला
अचानक दगा देतो.
तेंव्हा जपलेल्या मैत्रीचा
अक्षरश: भुगा होतो.

राजकारणात हे सगळे
गृहीत धरले जाते !
गरजवंताला अक्कल नसते
यावरूनच ठरले जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Thursday, June 3, 2010

मैत्रीचे राजकारण

***** आजची वात्रटिका *****
*********************

मैत्रीचे राजकारण

जेंव्हा मित्रच मित्राला
अचानक दगा देतो.
तेंव्हा जपलेल्या मैत्रीचा
अक्षरश: भुगा होतो.

राजकारणात हे सगळे
गृहीत धरले जाते !
गरजवंताला अक्कल नसते
यावरूनच ठरले जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

धर्म-अधर्म

***** आजची वात्रटिका *****
*********************

धर्म-अधर्म

आघाडी आघाडी रहात नाही,
युतीही युती रहात नाही.
स्वार्थ आडवा आला की,
कुणाची कुणाला भीती रहात नाही.

जमेल तसा हात मग
दुसर्‍याच्या वाट्यावर मारला जातो !
राजकीय धर्मसुद्धा
सरळ फाट्यावर मारला जातो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

धर्म-अधर्म

***** आजची वात्रटिका *****
*********************

धर्म-अधर्म

आघाडी आघाडी रहात नाही,
युतीही युती रहात नाही.
स्वार्थ आडवा आला की,
कुणाची कुणाला भीती रहात नाही.

जमेल तसा हात मग
दुसर्‍याच्या वाट्यावर मारला जातो !
राजकीय धर्मसुद्धा
सरळ फाट्यावर मारला जातो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

कशाला कल की बात?

***** आजची वात्रटिका *****
*********************

कशाला कल की बात?

आजचे सांगायचे सोडून
कल की बात करू लागले.
जगबुडी आल्याचे सांगुन
भक्तांचा घात करू लागले.

भक्ती वेंधळे
त्यांना मुक्तीची आशा आहे !
गुरूबरोबर भक्तांनाही
खरोखरच नशा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, June 1, 2010

नेट रेट

***** आजची वात्रटिका *****
***********************

नेट रेट

सरकारी खुर्चीला
टेबलाखालची हाव असते.
भ्रष्टाचार तो भ्रष्टाचार
त्याला वेगवेगळे नाव असते.

कुठे लपून छपून
कुठे व्यवहार थेट असतो !
पदाला शोभेल असाच
हरामखोरीचा रेट असतो !!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

लातूर पॅटर्नचा टर्न

***** आजची वात्रटिका *****
***********************

लातूर पॅटर्नचा टर्न

लातूरचे पाय
नांदेडकडून ओढले गेले.
बघता बघता पॅटर्नचे
कंबरडे मोडले गेले.

ख‍र्‍या गुणवत्तेला
कॉपीमुक्तीचा धोका नाही !
आलेला निकाल सांगतो
गुणवत्ता कुणाचा ठेका नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

आमची गुणवत्ता

***** आजची वात्रटिका *****
*********************

आमची गुणवत्ता

सुंभ जाळला तरी
आपला पिळ कायम असतो.
पहिला कोण? दुसरा कोण?
विचारणे आपला नियम असतो.

खरी गुणवत्ता देखील
आकड्यांच्या नादी लागते !
गुणवत्ता कळायला
आपल्याला अजूनही यादी लागते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

दैनिक वात्रटिका18मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -285वा

दैनिक वात्रटिका 18मार्च2024....वर्ष- तिसरे.. अंक -285वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1MGfNBr1FckQay1GmVdS_it...