Sunday, January 20, 2013

प्रथम वास्तव बघा

आपल्याला पाहिजे ते सत्य
अभ्यासाअंती काढले आहे.
आपल्याला पाहिजे ते पिल्लू
अहवालातून सोडले आहे.

प्रथमदर्शनी तरी त्यांनी
असेच पिल्लू सोडले आहे.
प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तेवर
भलेमोठे प्रश्नचिन्ह ओढले आहे.

प्रथम केवळ साक्षरता नको,
सर्वांगिण गुणवत्ता मोजली पाहिजे !
सकारत्मकतेतून सुधारणावादाची दृष्टी
असरदारपणे रूजली पाहिजे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

उपाध्यक्ष राहूल


'मेवा’भाव


Wednesday, January 16, 2013

कोई माने ना माने

लिहिता लिहिता साहित्यिक
आक्रमक व्हायला लागले.
एक साहित्यिक दु्स‍र्‍या साहित्यिकाला
धमक्या द्यायला लागले.

कुणाचा पुरोगामी विचार पक्का,
कुणाचा पुरोगामी विचार उपरा आहे !
आपला कोता पल्ला माहित असूनही
जो रेटतो तो गुपरा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)



'धड’धडीत खोटे


Saturday, January 5, 2013

दुहेरी दुर्दैव

"परस्त्री मातेसमान"
जणू दिखाऊ ’स्लोगन’ आहे.
दिल्लीबरोबर गल्लीतही
बलात्काराची लागण आहे.

माणसातल्या जनावरांना
चेहर्‍यावरून जोखता येत नाही!
दिल्लीतला निषेध करताना
गल्लीतला रोखता येत नाही!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

सांस्कृतिक अंधानुकरण


Wednesday, January 2, 2013

सरकारी सनद

सनदी अधिकार्‍यांना
सेवानिवृत्तीनंतरही सनद असते.
कोणतीही चौकशी समिती असो,
त्यांचे पद मानद असते.

जसा अहवालाचा निष्कर्ष हवा
तसा निष्कर्ष देय असते !
जणू सेवानिवृत्तीनंतही
ही खात्रीची सोय असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

चिमटा


दैनिक वात्रटिका19मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -286वा

दैनिक वात्रटिका 19मार्च2024....वर्ष- तिसरे.. अंक -286वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1-fbx6QEScldHj2QiABT650...