दैनिक वात्रटिका l 31मार्च 2025
वर्ष- चौथे
अंक - 301वा l पाने -54
अंक डाऊनलोड लिंक -
https://drive.google.com/file/d/1S4SAD0tMR_eqzmeUqaSQGBVCEC5_GNN6/view?usp=drivesdk
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
#मराठीवात्रटिका
#दैनिकवात्रटिका
Monday, March 31, 2025
दैनिक वात्रटिका l 31मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 301वा l पाने -54
मुद्दे सलामत तो...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका
--------------------
मुद्दे सलामत तो...
ते कशाचे राजकारण करतील,
याची कसली सुद्धा हमी नाही.
त्यांनी ठरविले तर त्यांना,
मुद्द्यांचीसुद्धा कसलीच कमी नाही.
राजकारणाला मुद्देच असावेत,
त्यांचे काहीसुद्धा अडलेले नाही
राजकारण करण्यासाठी,
कुत्र्या मांजरांनाही सोडलेले नाही.
जित्या जागत्या माणसांना तर,
ते केव्हाही ठोकरू शकतात !
तरीही पडलेच मुद्दे अपुरे तर,
ते मेलेले मुडही उकरू शकतात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8873
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
31मार्च2025
Sunday, March 30, 2025
दैनिक वात्रटिका l 30मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 300वा l पाने -54
आघाडी धर्म ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
--------------------
आघाडी धर्म
सत्तेवर कधी आघाडी असते,
सत्तेवर कधी तिघाडी असते.
त्यांना काहीच फरक पडत नाही,
जरी अधून मधून बिघाडी असते.
एकमेकांना पाचर मारून मारून,
आपलाच खुट्टा घट्ट केला जातो.
जो पुरवला जाऊ शकत नाही,
असा राजकीय हट्ट केला जातो.
विसंवाद वाढवून वाढवून,
परस्पर संवाद साधला जातो !
ताणून ताणून तुटू लागले की,
मित्राला आघाडी धर्म बोधला जातो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8872
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
30मार्च2025
Saturday, March 29, 2025
दैनिक वात्रटिका l 29मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 299वा l पाने -54
कॉमेडी..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
--------------------
कॉमेडी
लोकशाहीची झाली कॉमेडी,
कॉमेडीयनला चांगली संधी आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने,
सगळीकडूनच अंदाधुंदी आहे.
जेव्हा प्रवृत्तीवरची टीका,
व्यक्ती वरती येऊ शकते.
तेव्हा आपलीच अभिव्यक्ती,
आपल्यावर बुमरँग होऊ शकते.
याचा अट्टाहास नको,
टाळ्या आणि हास्य पाहिजे !
भाष्य कुणा व्यक्तीवर नको,
प्रवृत्तीवरती भाष्य पाहिजे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8871
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
29मार्च2025
Friday, March 28, 2025
दैनिक वात्रटिका l 28मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 298वा l पाने -54
दैनिक वात्रटिका l 28मार्च 2025
वर्ष- चौथे
अंक - 298वा l पाने -54
अंक डाऊनलोड लिंक -
https://drive.google.com/file/d/1QFQFkgKdfL7eY4viFxyJjgKQ7MwCKYw7/view?usp=drivesdk
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
#मराठीवात्रटिका
#दैनिकवात्रटिका
सौगात....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
--------------------
सौगात
आपल्याच प्रतिमेवर,
आपलीच मात आहे.
वाल्याचा वाल्मिकी होतोय,
हीसुद्धा एक सौगात आहे.
सौगात सुद्धा विरोधकांना,
आता खैरात वाटते आहे.
मित्रत्वामध्ये नाही ते सुख,
त्यांना वैरात वाटते आहे.
जे आहे ते उघड उघड,
त्यात असे काय राज आहे?
विरोधकांच्या मनात मात्र,
बिल्ली आणि हाज आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8870
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
28मार्च2025
Thursday, March 27, 2025
दैनिक वात्रटिका l 27मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 297 वा l पाने -54
दैनिक वात्रटिका l 27मार्च 2025
वर्ष- चौथे
अंक - 297 वा l पाने -54
अंक डाऊनलोड लिंक -
https://drive.google.com/file/d/1PftNXZYxW3OhgN-NQNmu5GPL71v8FLN3/view?usp=drivesdk
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
#मराठीवात्रटिका
#दैनिकवात्रटिका
शाब्दिक कोट्या
--------------------
शाब्दिक कोट्या
राजकारणामुळे शब्दा शब्दाला,
वेग वेगळा रंग येऊ शकतो.
साधा गद्दार शब्द उच्चारला तरी,
त्यावरती हक्कभंग होऊ शकतो.
राजकारणामुळे शब्दा शब्दाला,
आता वेगवेगवेगळा कंगोरा आहे.
करते तेच;करविते तेच,
वरती पुन्हा त्यांचाच डांगोरा आहे.
जसे त्यांचे शब्द आहेत,
तशा त्यांच्याच तर कोट्या आहेत!
खोक्याला खोके म्हटले तरी,
त्यांच्या कपाळावर आठ्या आहेत!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8869
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
27मार्च2025
Wednesday, March 26, 2025
दैनिक वात्रटिका l 26मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 296 वा l पाने -54
एक ऐतिहासिक संवाद
Tuesday, March 25, 2025
मर्कट लिला ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
--------------------
मर्कट लिला
आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची,
उठता बसता टीमकी वाजवू नका.
चेकाळलेल्या माकडांसमोर,
उगीच आपले नाक खाजवू नका.
शेवटी माकडे ती माकडेच,
उगीच त्यांच्या हाती मद्य देऊ नका.
आपलीच लाल म्हणणाऱ्यांच्या हाती,
पुन्हा पुन्हा नवे वाद्य देऊ नका.
माकड काय? मर्कट काय?
अगदी अजब त्यांचे तर्कट आहे !
वैचारिक प्रगल्भतेचा दुष्काळ,
सगळाच मामला पोरकट आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8867
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
26मार्च2025
Monday, March 24, 2025
विडंबन ते विटंबना ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
--------------------
विडंबन ते विटंबना
पूर्वीचा काळ राहिला आहे,
या भमामध्ये कोणी राहू नये.
आपल्या विडंबन कवितेची,
विटंबना कविताही होऊ नये.
विडंबन वेगळे, विटंबना वेगळी,
ही सीमारेषा पाळली पाहिजे.
दुसऱ्याचा खांदा आपली बंदूक,
ही घोडचूक टाळली पाहिजे.
एकामुळे दुसऱ्याची अभिव्यक्ती,
स्वैराचार ठरवली जाऊ शकते !
आज एकावर आलेली वेळ,
उद्या सगळ्यावरच येऊ शकते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8866
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
24मार्च2025
Sunday, March 23, 2025
दैनिक वात्रटिका l 23मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 294 वा l पाने -54
दैनिक वात्रटिका l 23मार्च 2025
वर्ष- चौथे
अंक - 294 वा l पाने -54
अंक डाऊनलोड लिंक -
https://drive.google.com/file/d/1NJQ3z-g_gWGKt068LaEgkfgftOLgdspT/view?usp=drivesdk
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
#मराठीवात्रटिका
#दैनिकवात्रटिका
चौकशांचा अहवाल....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
--------------------
चौकशांचा अहवाल
कालचे चौकशी अहवाल म्हणे,
उलट सुलट आणि मिथ्या आहेत.
आत्महत्यांचे झाले खून,
खुनाच्या म्हणे आत्महत्या आहेत.
नव्या चौकशी अहवालानी,
जुना अहवालांचा रियालिटी चेक आहे.
कालपर्यंत जे होते एन्काऊंटर,
आज म्हणे ते एन्काऊंटरही फेक आहे.
कुठे जाळल्या, कुठे जळाल्या,
कुठे फायलींना पाय फुटले आहेत !
नव्या आणि जुन्या अहवालावरही,
संशयाचे काळे ढग दाटले आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8865
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
23मार्च2025
Saturday, March 22, 2025
दैनिक वात्रटिका l 22मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 293 वा l पाने -54
सीबीएसई पॅटर्न
--------------------
सीबीएसई पॅटर्न
एक देश एक शिक्षण,
याचेच हे लक्षण आहे.
राज्यातल्या शाळांना,
सीबीएसई शिक्षण आहे.
तसाच झाला पुरवठा,
जशी लोकांची मागणी आहे.
शालेय अभ्यासक्रमाची,
70:30अशी विभागणी आहे.
इंग्रजी शाळांच्या वेडावरती,
सीबीएसईचा उतारा आहे !
ग्लोबलतेच्या हौसेपोटी,
लोकलवर पोतारा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8864
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
22मार्च2025
Friday, March 21, 2025
दैनिक वात्रटिका l 21मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 292 वा l पाने -54
राजकीय मुद्द्यांची गोष्ट....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
--------------------
राजकीय मुद्द्यांची गोष्ट
काही गोष्टी उघड करून,
काही हातचे राखलेले असते.
कोणता मुद्दा कधी उचलायचा?
याचे वेळापत्रक आखलेले असते.
राजकारणाचा सगळा कार्यक्रमच,
अगदी असा टाईम बॉण्ड असतो.
जेव्हा जसा स्वार्थ असेल,
तसा पॉलिटिकल स्टॅन्ड असतो.
काल सुसंगत आणि काल विसंगत,
मुद्द्यांना बरोबर फिरवले जाते !
त्यांच्या विजयाच्या शक्यतेचे कारण,
मुद्द्यांना मुद्द्यांनी हरवले जाते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8863
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
21मार्च2025
Thursday, March 20, 2025
दैनिक वात्रटिका l 20मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 291 वा l पाने -54
दैनिक वात्रटिका l 31मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 301वा l पाने -54
दैनिक वात्रटिका l 31मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 301वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1S4SAD0tMR_eqzmeUqaS...

-
आजची वात्रटिका ---------------------- गेट-टुगेदर भूतकाळातले मित्र -मैत्रिणी, खूप वर्षानंतर भेटू लागले. उजळून येतात आठवणी, छोटे झाल्यासारखे व...